एक आवडलेले छायाचित्र

एक आवडलेले छायाचित्र आणि त्यावर व्यक्त केलेली एक सुंदर कॅामेंट, छान लिहलेली वाटली.


मला हे चित्र स्त्री जीवनाचे प्रतीक वाटत.

'आदिशक्ती'

निसर्गाशी तादात्म्य पावून, सुष्टीत विखुरलेल्या सर्जनशीलतेच्या खुणा तिने आत्मसात केल्या ...

मान्य ..पृथ्वीत आपली पाळंमूळ खोलवर रुजवण्यात खर्च झाली तिची शक्ती..

आणि निसर्गाची पानगळ हि जणू बनलंय तिच्या इच्छांचे प्रतीक.

पण तिच्या उपजत कलाकौशल्याने तिने तयार केलं कधीही न विरणारं वस्त्र..

तिला प्रत्येक फांदीवर उमलवायचे आहेत उद्याचे हिरवे कोंब...

या निर्मितीशक्तीच्या साक्षात्काराला खास आमंत्रण तिला निसर्गानेच दिलेलं..

जीवन -मृत्युच्या चिंतनापेक्षा जगायला आधार बनणं,जगवणं, फुलवणं हे तर तिचं आत्मिक बळ..

जगवण्याची ताकद हि स्वतःला विसरून, स्वतःच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यासाठी सहजपणे जगण्यात स्रीजीवनाचे मर्म...

इवलासा प्रकाशाचा कवडसा तिच्या पर्यन्त पोहचू पहातो.. इथेच नव्या उमेदी जागृत झाल्या आहेत.

पानगळीने झालेला फायदा हाच की आता प्रकाश गाळून तिच्या पर्यत पोहचत नाही..

भविष्याला मिळाली आता नव्या इच्छा,आकांक्षांची ऊब..

सृष्टीसृजनाच्या प्रभावी कार्याची चावी तिच्यापाशीआहे..परंपरेच्या पेटाऱ्यात बंद असलेल्या तिच्या नैसर्गिक जगण्याच्या उर्मीला मुक्त करण्यासाठी तिचे मनगट मजबूत झालेले..

ती आदिशक्ती!


देवयानी पेठकर

19 views0 comments