google.com, pub-8541545695382139, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

प्रिय सुनिताताई

सुनीताबाई देशपांडे पूर्वाश्रमीची सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून 12, 1946 रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले.

सुनीता देशपांडे यांना जी.ए.कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ‘प्रिय जीए पुरस्कार’ इ.स. 2008मध्ये मिळाला होता. जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांचं मैत्र अतिशय समृद्ध होतं. आठ वर्षं त्यांचा पत्रव्यवहार होता. जीएंनी स्वतःला सात दरवाज्यांमागे बंदिस्त करून घेतलं असलं तरी सुनीताबाईंशी त्यांच्या असलेल्या पत्रव्यवहारामुळे त्यांची जीवनाविषयीची आणि साहित्याविषयीची भूमिका त्या पत्रांमधून आपल्यापर्यंत पोहोचू शकली. तीक्ष्ण संवेदनेच्या, अस्मितासंपन्न सुनीताबाईंनी जीएंना लिहेलेली पत्रं हा संपन्न लेखनशैलीचा एक अप्रतिम नमुना आहे.


त्यांची प्रकाशित पुस्तके “आहे मनोहर तरी’ (1990), “प्रिय जी.ए. (2003), “मण्यांची माळ’ (2002), “मनातलं अवकाश’, “समांतर जीवन’ (1992), सोयरे सकळ (1998).


सुनीताबाई देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी. मात्र एवढीच ओळख ठेवून त्या वावरल्या नाहीत. लेखक म्हणून त्यांचे स्वतंत्र स्थान साहित्यविश्वात होते. पुलंना सांभाळत त्यांचे लेखनव्यवहार सांभाळणाऱ्या, प्रसंगी कर्तव्यकठोर भूमिका निभावणाऱ्या, माणसांना जोडणाऱ्या तीक्ष्ण बुद्धीच्या, तर्कशुद्ध विचार करणाऱ्या सुनीताबाई यांची समाजातील प्रतिमा वेगळी होती.

लेखिका सुनीता देशपांडे जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !!!

6 views0 comments
bottom of page